रेल्वे गेटमनला मारहाण करणाऱ्यास अटक

Police arrested : रेल्वे गेटमनला मारहाण करणाऱ्यास अटक

police-arrested-man-for-beating-railway-gatman

Police News24: Police arrested : पुणे,दि. २ नोहेंबर : शासकीय कर्तव्य बजावत असताना रेल्वे गेटमनला

मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष खिल्लारे (वय २७. रा. वडगाव मावळ, मुळगाव गोजेगाव, ता.औंढा नागनाथ, जि. हिंगोली)

हे बोपोडीत रात्री १.१३ वाजता बोपोडी रेल्वे स्टेशनजवळील गेट नं. ६२ येथे सरकारी कर्तव्य पार पडत असताना गदग एक्सप्रेस गेटजवळून पास झाल्यावर गेट उघडत असताना,

गेट उघडण्यास उशीर झाल्याने डिओ गाडीवरील दोन इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत करून सरकारी कामात अडथळा आणला.

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले.

ज्येष्ठ महीला पत्रकार निशा पाटील यांनी केली आत्महत्या

सदर गुन्ह्यात पोलिस अधिक्षक दिपक साकोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग याना आदेश दि ले.

सदर गुन्हा मध्यरात्री झाला असल्याने व कोणताही पुरावा नसताना खबऱ्यांकडून माहिती काडून

त्यावरून स्टॅणली धनसेकर (वय २७, रा. बोपोडी) मयुर वहवारिया (वय २९, रा. खडकी बझार) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोघांनी हा गुन्हा आपण केल्याची कबुली दिली.

सदर कामगिरी लोहमार्ग पुणे पोलिस अधिक्षक दिपक साकोरे, अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार यांचे मार्गदर्शनाखाली

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद झोडगे, कर्मचारी सुहास जाधव,

चालक दिलीप खोत , इम्तियाज अवटी, सचिन पवार, अमरदिप साळुके, विशाल पवार, यांनी केली आहे.

इतर बातमी :हडपसर येथे अॅक्टीव्हाच्या डिक्कीतून ४,५०,००० रुपये गुल

Police News 24 :हडपसर पोलिस स्टेशन च्या हद्दीतील रविदर्शन येथील

सारस्वत बँके समोर दिनांक २२ /१०/ २०१९ रोजी दुपारी .१२/४५ वाजता अॅक्टीव्हा दुचाकी ही पार्क केली होती

दुचाकीतील डिक्की मध्ये फिर्यादी महिला हया ते काम करीत असलेल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीची

रोख रक्कम ४,५०,००० रुपये व बँकेचे दोन पासबुक डीकीला लॉक करुन ठेवले होते ,

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरचा ऐवज चोरी करून नेला असल्याची तक्रार फिर्यादी महिलेने

हडपसर पोलिस स्टेशन येथे केली असून पोलिस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करत आहे.

हेपण वाचा : मुद्रा सोसायटी मध्ये ९८,५००रूपयाची कॉपर वायर चोरी

One thought on “रेल्वे गेटमनला मारहाण करणाऱ्यास अटक

Comments are closed.